मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९) याची कलमे १४९, ४५४ आणि ४५७ पोट-कलम (७) खंड (ब) यासह कलम १२७,पोट-कलम (२), खंड (ग) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून तयार केलेला ठाणे शहर महानगरपालिकेच्या नियमाचा पुढील मसुदा, कलम ४५५ यांच्या पोट-कलम (१) अनुसार आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर आणि उक्त अधिनियमाच्या कलम ४५५ चे पोट-कलम (२) सह कलम १४९ च्या पोट-कलम (२) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे राज्य शासनाच्या मंजुरीने, याद्वारे उक्त कलम ४५५ द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे शासकीय राजपत्रात अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येत आहे व ते दिनांक १ एप्रिल २००७ पासून अंमलात येतील.
१. संक्षिप्त नाव
या नियमांना, “ठाणे शहर महानगरपालिकेचे मांजऱ्यांवरील करविषयक नियम, २००५”, असे म्हणावे.
२. व्याख्या
(१) या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,
- (क) "अधिनियम": मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ असा आहे.
- (ख) "शहर" याचा अर्थ, भारताचे संविधान याच्या अनुच्छेद २४३ क्यू याचा खंड (२)
अन्वर्ग काढलेल्या अनुसूचीद्वारे राज्य शासनाने विनिदिष्ट केलेल्या ज्या मोठ्या
नागरी क्षेत्रातील भागासाठी महानगरपालिका घटीत केली आहे असे ठाणे शहर क्षेत्र,
असा आहे;
- (ग) “मांजर" यात, तीन महिने किवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नर आणि मादी
मांजराचा समावेश आहे;
- (प) "नमुना" याचा अर्थ, या नियमासोबत जोडलेला नमुना, असा आहे
- (ड) "कलम" याचा अर्थ, अधिनियमाचे कलम, असा आहे;
- (च) " कर " याचा अर्थ, कलम १२७ चे पोट-कलम (२) खंड (ग) मांजरावर वसुलीयोग्य
कर, असा आहे;
- (छ) "वर्ष" याचा अर्थ, १ एप्रिल रोजी सुरू होणारे आणि ३१ मार्च रोजी संपणारे
वर्ष, असा आहे;
- (ज) " लसीकरण" याचा अर्थ, लस टोचणीच्या साधनानी, लस टोचून विशिष्ट
संक्रमणाविरुद्ध सक्रीय प्रतिक्षमता उत्पन्न करण्याची पद्धत,असा आहे;
- (झ) "झुनोटीक रोग" याचा अर्थ, जनावरे आणि मनुष्यप्राणी यांच्यातील परस्पर
संपर्कामुळे होणारे रोग, असा आहे;
(२) यात वापरण्यात आलेले, परंतु व्याख्या न केलेल्या शब्द प्रयोगाना अधिनियमात त्या
शब्दांना जे अर्थ नेमून दिले असतील तेच अर्थ असतील,
३. कर भरण्यास पात्र असणारी व्यक्ती.
नियन१४ च्या तत्तुदीच्या अधीन राहून, व्यक्ती शहर क्षेत्रात आपल्या ताब्यात एखादा
मांजर ठेवील अशी प्रत्येक व्यक्ती कर भरण्यास पात्र असेल.
४. कराचा दर.
प्रत्येक मांजरास दरवर्षी किया त्या वर्षाच्या काही भागासाठी शंभर रुपये किया
वेळोवेळी आवश्यक केल्याप्रमाणे महानगरपालिकेने ठरविलेला कर वसुलीयोग्य असेल.
५. . कर आगाऊ भरता येईल.
प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये, त्या वर्षाचा पूर्ण कर भरता येईल.
६. कर भरण्याची पद्धती.
- (एक) कोणत्याही वर्षात जिला आपल्या ताब्यात मांजर ठेवायची इच्छा आहे अशी
कोणतीही व्यक्ती, त्या वर्षाचा एप्रिल महिना संपण्यापूर्वी, आपल्या ताब्यात
मांजर ठेवण्याच्या परवानगीसाठी आयुक्ताकडे नमुना क मध्ये अर्ज करील. परंतु
त्या वर्षाचा एप्रिल महिना संपल्यानंतर कोणत्याही वेळी, मांजर पाळण्याची इच्छा
असणारी कोणतीही व्यक्ती, मांजर ताब्यात घेतल्यापासून सात दिवसाचे आत,
आयुक्ताकडे अर्ज करील.
- (दोन) अशा प्रत्येक अर्जासोबत कराची रक्कम अणि त्याचप्रमाणे पोट-नियम (३) मध्ये
निर्देशिलेला बिल्ला देण्यासाठी देय असणारी फी असेल.
- (तीन) असा अर्ज मिळाल्यानंतर, आयुक्त त्या अर्जाची पडताळणी करेल आणि मांजराची
तपासणी करेल आणि नमुना " ख " मध्ये परवानगी देईल. त्यानंतर आयुक्त मांजराचा
अनुक्रमांक असणारा एक बिल्ला देईल. त्या त्या वर्षाकरिता आयुक्तांनी निश्चित
केलेल्या कराच्या रकमेसह अशा बिल्ल्याची फी देखील देय होईल.
७. मांजराचा मृत्यू, तो हरविणे, त्याला झूनोटीक रोग होणे इत्यादी बाबतची माहिती
देणे.
ज्या मांजराच्या संबंधात कर भरण्यास पात्र आहे अशा व्यक्तीचा मांजर जर हरविला
किंवा तो अन्य व्यक्तीचा मांजर जर हरविला किंवा हो अन्य व्यक्तीच्या हवाली करण्यात
आला किंवा त्याचे स्थलांतर करण्यात आले किंवा त्याला कोणताही झूनोटीक रोग झाला
किंवा तो मृत्यू पावला तर, लायसन्धारक, त्यासंबंधीची लेखी सूचना, तत्काळ आयुक्तांना
देईल. अशी सूचना मिळाल्यानंतर अशा मांजराच्या संबंधात कर देण्याचे दायित्व
नंतरच्या वर्षापर्यंत थांबविण्यात येईल. अशी सूचना न मिळाल्यास अशा व्यक्तीकडून कर
वसूल करणे चालू राहील.
८. पुढील विविक्षित प्रकरणामध्ये आणखी कर देणे आवश्यक नसेल.
- (क) जर कर अगोदरच भरला असेल तर, एखाद्या मांजराचा ताबा ठेवण्यात कोणताही बदल
झाला तर, कोणत्याही वर्षात कर देय होणार नाही.
- (ख) परंतु, जिच्या ताब्यात मांजर येणार आहे अशा व्यक्तीने, त्या मांजराचा
मालक म्हणून अशा व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी त्या मांजराच्या पूर्वीच्या
मालकाला मिळालेली लेखी परवानगी आयुक्तास सादर केली तर, कोणताही कर देय होणार
नाही.
९. बिल्ल्याच्या संबंधातील तरतूद.
- (एक) नियम ६, पोट-नियम (३) अन्वये पुरविण्यात आलेला बिल्ला संबंधित
मांजराच्या गळ्यात बांधण्यात येईल.
- (दोन) जर असा बिल्ला हरविला तर, आयुक्त आवश्यक ती चौकशी केल्यानंतर, आवश्यक ती
फी भरल्यावर एक नवीन बिल्ला देईल.
१०. तपासणीसाठी मांजर हजर करणे.
लायसनधारक, जेव्हा केव्हा हजर करण्यास फर्माविण्यात येईल तेव्हा, आयुक्तापुढे किंवा
याबाबत त्याने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यापुढे, कोणत्याही वाजवी वेळी,
तपासणीसाठी आणि पडताळणीसाठी हजर करेल.
११. मांजराचे लसीकरण.
- (एक) मालक किंवा मांजर ताब्यात असलेली व्यक्ती, तिच्या मांजराला रेबीज,
गॅस्टोइटेरायटीस, इनफेकशिअस कॅनाइन हिपाटायसिस, डिस्टेपर, लेप्टोस्पियरोसिस
इत्यादी सारखे रोग आयुक्ताकडून निश्चित करण्यात येतील अशा अन्य रोगांच्या
संबंधात लस देईल.
- (दोन) तपासणी आणि पडताळणी दरम्यान निर्देश दिले असतील तेव्हा, मालक, मांजराला
लस देईल.
१२. तपासणी, जप्ती इत्यादी.
- (एक) जर एखादा मांजर, कोणत्याही इमारतीतील किंवा वसाहतीतील रहिवाशांना उपद्रव
देत आहे असे आढळून आले किंवा तसे कळविण्यात आले असेल तर, आयुक्त किंवा त्याने
याबाबत योग्यरित्या प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती, तपासणीच्या प्रयोजनासाठी
कोणत्याही जागेत प्रवेश करेल आणि मांजराला जप्त करू शकेल.
- (दोन) असा जप्त केलेला कोणताही मांजर, महानगरपालिकेच्या मांजरगृहात ठेवण्यात
येईल आणि अशा जप्तीच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत, जर कोणतीही व्यक्ती
अशा मांजराचा मालक आहे किंवा तो त्याच्या ताब्यातील मांजर आहे याबाबत
आयुक्ताचे समाधान झाले तर, आयुक्त, जर कोणता देय असेल तो कर भरल्यावर आणि
मांजर पकडून ठेवल्यामुळे आयुक्ताला आलेला कोणताही खर्च दिल्यावर आणि यानंतर
मांजराला लायसनच्या शर्तीनुसार ठेवण्यात येईल आणि इमारत किवा वसाहतीतील
रहिवाशाना त्याचा उपद्रव होणार नाही अशी हमी त्या व्यक्तीने दिल्यावर, तो
मांजर त्या व्यक्तीकडे सुपूर्द करण्याचा आदेश देऊ शकेल.
- (तीन) कोणत्याही व्यक्तीला चावला आहे असा एखादा लायसनधारी मांजर जर
महानगरपालिकेच्या मांजरगृहात आणला असेल तर, मांजराच्या मालकाची किंवा असा
मांजर ज्याच्या ताब्यात आहे अशा व्यक्तीची किंवा तो मांजर जिला चावला आहे
त्या व्यक्तीची, मांजराच्या उबवणीच्या कालावधीत त्याला तिथे ठेवण्याची इच्छा
असेल तर, आयुक्ताकडून ठरविण्यात येईल अशी मांजराला तिथे अडकवून ठेवण्याचा
खर्च दिल्यानंतर, आयुक्त, त्या मांजराला तिथे ठेवण्याचा आदेश देऊ शकेल.
१३.
नियम १२ अन्वये कोणताही मांजर अडकवून ठेवला असताना, त्याच्या तपासणीत त्या
मांजराला झुनोटीक रोग झाला असल्याचे आढळून आले तर,आयुक्त, मालकाच्या किंवा
मांजराचा ताबा असलेल्या व्यक्तीच्या खर्चाने, त्या मांजराला नष्ट करण्याचा आदेश
देऊ शकेल.
१४. सूट
या नियमामधील कोणतीही गोष्ट, महानगरपालिका क्षेत्रातून जाणाऱ्या खऱ्याखुऱ्या
प्रवाशांच्या जवळ असलेल्या कोणत्याही मांजराला किया एकूण तीस दिवसांपेक्षा अधिक
नाही अशा कालावधीसाठी महानगरपालिका क्षेत्रात प्रासंगिक सातत्याने पाळण्यात
येणाऱ्या कोणत्याही मांजराला लागू होणार नाही.